आंगणेवाडीतील स्वच्छतागृहासाठी भाविकांनी व्यक्त केलं समाधान !

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 03, 2024 06:28 AM
views 522  views

मालवण : आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळच्या सुलभ स्वच्छतागृह बांधकाम विभागाच्या मार्फत बांधण्यात आले आहे. या प्रसाधनगृहामध्ये १३ युरोपियन वॉटर क्लोसेट, १६ इंडियन वॉटर क्लोसेट, ८ स्नानगृह, २ लॉकर खोली, ४ अपंग शौचालय, ४ चेंजिंग खोली, १ हिरकणी कक्ष, १६ वॉशबेसिन, १४ युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात आणि त्यांना महत्त्वाची उत्तम सोय आणि स्वच्छ असे  स्वच्छतागृह हवी असते आणि ते त्यांना या आंगणेवाडी मध्ये पाहायला मिळाले त्यामुळे बऱ्याच भाविकांनी वा एवढे भारी स्वच्छतागृह   असे उद्गार काढले. तसेच या यात्रेसाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य विभाग बांधकाम विभाग या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या स्वच्छ आणि चांगल्या स्वच्छतागृहामुळे आमची गैरसोय दूर झाली असल्याचे प्रत्येक जण सांगत होता.

पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख ८१ हजार ७४५ रुपये खर्च करत महिला व पुरुषांसाठी हे प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे.