आंगणेवाडी भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित नाही

आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने केलं स्पष्ट
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 14, 2023 21:34 PM
views 1787  views

मालवण : आंगणेवाडी यात्रेची तारीख ही अद्याप निश्चित झालेली नाही. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर यात्रेची तारीख ठरविण्यात येते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तारीख निश्चित झाल्यावर मंडळाच्या वतीने तारीख जाहीर करण्यात येईल असे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने स्पष्ट केले आहे. 


 नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांची श्रद्धास्थान असणारी  मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीकडे पाहिले जाते. या देवीच्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. यात्रेच्या तारखेबाबत दरवर्षी मंडळाने तारीख जाहीर करण्यापूर्वी अफवा पसरवल्या जातात. यावर्षीही आंगणेवाडी यात्रा 15 फेब्रुवारीला असल्याची अफवा सोशल मीडियावर सुरू झाल्या. देवीचे लाखो भाविक व मुंबईकर चाकरमानी यांना या यात्रेच्या तारखेची आस लागलेली असते. तारीख निश्चित होताच यात्रेला येण्यासाठी बस खासगी गाड्या यासह ट्रेनचे बुकिंग करून सुट्ट्या मिळवण्याची धडपड सुरु होते. त्यामुळे या फिरत असलेल्या तारखेबाबत आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाशी संपर्क केला असता अद्याप यात्रेची तारीख निश्चित झालेली नाही. देवालयात व देवालयाबाहेर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. प्रथेप्रमाणे या कार्यक्रमानंतर यात्रेची तारीख निश्चित होईल व ती प्रसिद्ध केली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेला तो संदेश एक अफवा आहे. मात्र देवीच्या चरणी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अशा अफवा कोणीही पसरवू नयेत असे आवाहन आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.