...अन् ठाकरेंच्या चेहऱ्यावर उमलले स्मितहास्य !

Edited by:
Published on: November 13, 2024 16:24 PM
views 211  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलींच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पाहणुचारानंतर ठाकरेंसह तेली कुटूंबाकडून फोटोसेशन करण्यात आले. यावेळी ठाकरेंची नजर छोट्या शौर्यकडे गेली अन् एक वेगळ चित्र राजकारणाच्या धामधुमीत दिसून आलं. 

राजन तेली यांचा नातू शौर्य प्रथमेश तेली याचाकडे उद्धव ठाकरेंच लक्ष गेलं. छोट्या शौर्यन शर्टला लावलेली मशाल पाहून ठाकरेंनी त्याला जवळ घेतले. आपूलकीन विचारपूस करत छोट्या शौर्यशी गप्पा मारल्या. महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांची राजकीय डबलबारी सुरू असताना एक वेगळं चित्र यानिमित्ताने दिसून आले. राजकारणाच्या धामधुमीत छोट्या शौर्यमुळे ठाकरेंच्या चेहऱ्यावर देखील हसू फुलेल पहायला मिळाल.यावेळी राजन तेली, रूजिता तेली, प्रथमेश तेली, सिया तेली, सर्वेश तेली, शौर्य तेली, शुभम वळंजू व वळंजू व पिळणकर कुटुंबिय उपस्थित होते.