विधानसभा अध्यक्षपदी अँड राहुल नार्वेकर पुन्हा...!

सावंतवाडीच्या सुपुत्राला दुसऱ्यांदा बहुमान
Edited by:
Published on: December 09, 2024 12:15 PM
views 193  views

सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपुत्र, भाजप नेते अँड. राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते. 

राहुल नार्वेकर हे गेल्या अडीच वर्षाच्या शिंदे सरकारमध्येही विधानसभेचे अध्यक्ष होते. पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात विधानसभेच्या अध्यक्ष पदाची माळ पडली आहे. सावंतवाडीचे ते सुपुत्र असून कुलाबा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.महाविकास आघाडीन  उमेदवार  न दिल्याने राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष झालेत. महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने अँड. नार्वेकर यांनाच अधिक मतं मिळणार हे निश्चित होत. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडीतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.