
सिंधुदुर्गनगरी : कसाल हुमरणेवाडी येथील अनंत शिवराम परब (वय ७२, सध्या रा. पुणे) यांचे सोमवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे परब परिवार असा परिवार आहे. पत्रकार विनोद परब यांचे ते काका होते. त्यांच्या निधनाने कसाल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










