
देवगड : पुरळ - हुर्शी येथील अनंत यज्ञेश्वर करंदीकर (८२) यांचे २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वा. च्या सुमारास हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. 'बाळू काका इनामदार' या नावाने ते सुपरिचित होते. पुरळ, हुर्शी, कळंबई भागात ते गेली अनेक वर्षे पौरोहित्याचे काम करीत होते.
पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बाळू काका इनामदार यांच्या निधनाने मनमिळावू स्वभावाच्या आदर्श व्यक्तिमत्वाला आपण मुकलो असून गावाचा आधारवड हरपल्याची भावना दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक - अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी व्यक्त केली.