सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची रत्नागिरीत बदली

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 22:12 PM
views 346  views

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यकारी अभियंतापदी असलेल्या अनामिका चव्हाण यांची बदली रत्नागिरी येथे मार्ग प्रकल्प विभागात(RP) च्या कार्यकारी अभियंतापदी करण्यात आली आहे. सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या अनामिका चव्हाण यांची बदली दापोली येथील बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात करण्यात आली होती. या बदली विरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेऊन स्थगिती घेतली होती. त्यांनंतर त्यांना मार्ग प्रकल्प विभागात रत्नागिरी येथे कार्यकारी अभियंता पदावर बदली देण्यात आली आहे. बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन कार्यभार स्वीकारावा असे आदेश दिले आहेत.