
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर आडाळी एमआयडीसी येथे अज्ञात वाहनाने येथील भाजी दुकानाला व महानेटच्या खांबाला धडक दिल्याने खांब तुटून रस्त्यावर पडल्याने दोन तास वाहतूक बंद होती. आडाळी येथील काही ग्रामस्थांनी तो पोल बाजूला करून एकेरी वाहतूक सुरु केली.
या बाबत अधिक माहिती अशी की दोडामार्ग बांदा मार्गवर दोडामार्ग हुन बंद्याच्या दिशेने जाणारी अज्ञात गाडी आडाळी येथे आली असता पावसाचा व वळणाचा आनंदाच नआल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या महानेटच्या खाबाला धडक बसली ही धडक एवढी जबरदस्त होती की खांब मोडून रस्त्यावर पडला ही घटना रात्रीच्या वेळेस घडली असल्याचा आनंदाच येथील नागरिकांनी म्हटले आहे. याबाबत महानेटच्या ठेकेदाराला फोन द्वारे कल्पना दिल्या नंतर 2 तासानी पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र त्या ठिकाणी आडाळी येथील एका वयस्कर आजीचे भाजी- पाल्याचे लहान दुकान होते ते दुकान ही जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.