
मालवण : मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली आल्बट कामील फर्नांडिस यांच्या गिलनेट मासेमारी नौकेला मध्यरात्री अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे.
या आगीत नौका तसेच आतील जाळी जळत असताना परिसरातील स्थानिकांना जाग येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आल्बट फर्नांडिस यांना माहिती देण्यात आली. आग विजवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले मात्र नौका व आतील जाळी जळून गेली. या दरम्यान बाजूला एक नौका उभी होती त्याच्या इंजिनवर असलेल्या कपड्याला काही प्रमाणात आग लागली मात्र स्थानिकांनी ही आग विजवली.
जळालेल्या नौकेच्या बाजूला मातीत कोणीतरी धावत जात असलेल्या स्थितीत मातीत पायाचे ठसे दिसून येत होते. असे मच्छीमारांनी सांगितले. आग लावून कोणीतरी धावत पळून गेले असावे. या दृष्टीने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.