कोकणात उद्योग परिषद घ्यावी

राजन तेलींची केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडे मागणी 
Edited by: ब्युरो
Published on: April 10, 2023 20:31 PM
views 164  views

कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँकेच्यावतीने स्नेहबंध सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थिती हा वाढदिवस सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली केंदीय मंत्री नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या. कोकणातच नवे उद्योजक घडविण्यासाठी उद्योग परिषद घ्यावी, अशी मागणी राजन तेलींनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडे केली. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय अर्थमंत्री आनंद अडसूळ, माजी खासदार नरेंद्र सावईकर, नीलमताई राणे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.