घरासमोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला लागली आग

Edited by: दिपेश परब
Published on: August 01, 2023 13:06 PM
views 282  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला भटवाडी येथे आडीपूल जवळ मेघा पाटकर यांच्या घरासमोरील जागेत उभा असलेल्या आयशर टेम्पोला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीत टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र स्थानिकांसह वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब यांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा संशय  व्यक्त होत आहे.

आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एम एच ०७ एजे ३२०२ या आयशर गाडीच्या पुढील भागाला अचानक आग लागली. पाटकर कुटुंबीयांना ही आग लक्षात येताच त्यांनी तात्काळ शेजारी तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेला कळवले आणि स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रीतम सावंत तसेच वेंगुर्ला अग्निशमन दलाचे कर्मचारी भाऊ कुबल, गौरव आरेकर, पकंज पाटणकर, उमेश वेंगुर्लेकर, गणेश जाधव, मुकादम बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन बंबाच्या सहाय्याने आग विझवली. यावेळी वेंगुर्ले पोलीस कर्मचारी अमर कांडर यांच्यासहित अणसुर मधील युवकही आग विझविण्यासाठी सहभागी झाले होते.