कणकवलीत भास्कर जाधवांचा पुतळा जाळला

भाजपच्यावतीने राणेंवरील वक्तव्याचा निषेध
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2022 16:29 PM
views 426  views

कणकवली : कणकवलीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राणे कुटूंंबियांच्या विरोधात टीका केल्यास याद राखा, असा इशारा देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, मेघा गांगण, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, निखिल आचरेकर, गणेश तळगावकर ,स्वप्नील चिंदरकर, सचिन पारधिये, संदीप सावंत, आनंद घाडीगावकर, विजय चिंदरकर, समीर प्रभूगावकर, नितीन पाडावे, नयन दळवी, सर्वेश दळवी, पपू पुजारे आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.