गोव्यातील अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ?

जिल्हयातील एका रेल्वेस्थानकातील प्रकार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 16, 2023 21:37 PM
views 233  views

वैभववाडी : आई-वडील ओरडल्याच्या  रागातून घरा बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलींवर अज्ञाताने अतिप्रसंगाचा करण्याचा प्रयत्न केला.हा धक्कादायक प्रकार  जिल्हयातील एका रेल्वेस्थानकात आज सकाळी घडला.

गोवा येथे राहत असलेली अल्पवयीन मुलगीवर  आई वडील रागावले होते.त्यामुळे ती रागाने गोव्यातुन सावंतवाडी येथे आली. तेथुन ती रेल्वेतुन प्रवास करीत होती.ती रडत असल्यामुळे काही रेल्वेप्रवाशांनी तिची विचारपुस करीत तिला वैभववाडी रेल्वे स्थानकात उतरविले. त्यानंतर तेथील रेल्वे पोलीसांनी वैभववाडी पोलीसांशी सपंर्क साधला. वैभववाडी पोलीसांनी रेल्वेस्थानकात असलेल्या त्या मुलीला पोलीस स्थानकात आणल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका रेल्वे स्थानकात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्या मुलींशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्याचा हात झटकुन पळुन गेली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.दरम्यान मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी गोवा येथील पोलीस स्थानकात दिली होती. वैभववाडी पोलीसांनी तिच्या नातेवाईकांशी  संपर्क साधला. मुलगीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.