पाळयेतील बेपत्ता महादेव दळवी आढळून आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन...!

Edited by: संदीप देसाई
Published on: June 29, 2023 12:00 PM
views 90  views

दोडामार्ग : पाळये येथील महादेव नारायण दळवी ( वय 82 वर्षे)  हे 22 मे 23 रोजी पासून राहत्या घरातून नापता झालेले असून अद्यापही आढळून आलेले नाहीत. पोलीस नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

ते त्याचे राहते घरातून दि. 22/5/2023 रोजी सकाळी 06.00 वाजता गावातील नाल्यावर टॉयलेटला गेले असता परत आलेले नाहीत. वय वर्षे - 82 असलेल्या महादेव दळवी यांची उंची 5 फुट असून ते घरातून बाहेर पडले त्यावेळी  फूल सफेद रंगाची बनियान व  निळ्या रंगाची हाफ पँट घालून बाहेर पडलेले आहेत. त्यांचा  रंग - सावळा, चेहरा - गोल, सुरकुत्या पडलेला, कैस - काळे पांढरट, बोलीभाषा मालवणी मराठी आहे. तरी सदर नापता व्यक्ती मिळून आल्यास संपर्क त्यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार मो. नं. 8691909111 , सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय गवस, दोडामार्ग पोलीस ठाणे, मो. नं. 9423304004 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन दोडामार्ग पोलिसांनी केलं आहे.