
कणकवली : तालुक्यात गडगडाटासह झालेल्या पावसात साळीस्ते येथे घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पांडुरंग नारायण गुरव (वय 52) यांचा मृत्यू झाला. तहसीलदार आर. जे. पवार, मंडळ, अधिकारी संतोष नागावकर तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. गडगडाटासह झालेल्या या पावसात माळपट्टी भागात असलेल्या गुरव यांच्या घरावरच विजेचा लोळ कोसळल्याची माहिती मिळत आहे.