आजगावात भरवस्तीत आढळला ८ फुट अजगर

सर्पमित्र डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 17:42 PM
views 386  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगांव – पांढरेवाडी येथील भरवस्तीत गुरूवारी रात्री ८ फुटी अजगराला सर्पमित्र डॉ. रवींद्रनाथ रेडकर (सातार्डा) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

दरम्यान, सदर अजगर आपल्या भक्षाच्या शोधात भरवस्तीत आला असावा, असा अंदाज सर्पमित्र रेडकर यांनी व्यक्त केला. मात्र गजबजलेल्या  पांढरेवाडीत अजगर आढळल्याने रहिवाश्यांमध्ये भीती पसरली.