मेरी मिटटी मेरा देश उपक्रमांतर्गत ९ रोजी कणकवलीत अमृतकलश यात्रा

Edited by:
Published on: October 06, 2023 19:39 PM
views 119  views

कणकवली : आझादी का अमृत महोत्सवातर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत गावस्तर उपक्रमानुसार कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातून एक माती कलश आणण्यात येणार असून सोमवार  9 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती कणकवली येथे तालुकास्तरीय कार्यक्रम सकाळी 11 वाजता  आम.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे ग्रामस्तरावरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी सेवा भावी संस्था ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक आपल्या गावाची अमृत कलशसह यात्रा (चित्ररथासह ) उपरोक्त स्थळी नियोजित वेळेत पोहोचेल. व अमृतकलश यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समिती कणकवली आवारपर्यंत निघणार असून सदर कार्यक्रमास कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे  आम.नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

अमृत कलश यात्रेच्या वेळी मिट्टीगान, पथनाटय, देशभक्तीपर गीते विविध वाद्ये वाजवून उत्सवाचे वातावरणात कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच त्याच कार्यक्रमानिमित्त "अमृत महाआवास अभियान" सन 2021-22 व 2022-23 उत्कृष्ट काम करण्या-या संस्था / व्यक्तींना अमृत महाआवास अभियान पुरस्कार मा. आमदार महोदय यांचे हस्ते प्रदान करणत येणार आहे. या कार्यक्रमासाठी सदर दिवशी अमृत कलश यात्रेसह उपरोक्त स्थळी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन गट विकास अधिकारी पंचायत समिती कणकवली अरुण चव्हाण यांनी केलेले आहे.