आंबोली मंडळ उपाध्यक्षपदी अमोल सावंत यांची नियुक्ती

Edited by: विनायक गावस
Published on: September 12, 2023 12:35 PM
views 293  views

सावंतावडी : आंबोली मंडळ उपाध्यक्षपदी अमोल अर्जुन सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र अमोल सावंत यांना देण्यात आलं आहे. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकांत पक्षाला यश संपादन करून देण्यासाठी श्री. सावंत यांना मार्गदर्शन केलं. यावेळी आंबोली मंडळात पक्ष बांधणीसह आगामी निवडणुकांत शतप्रतिशत भाजपचं उद्दीष्ट घेऊन कार्यरत राहणार असल्याच वचन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना आंबोली मंडळ उपाध्यक्ष अमोल सावंत यांनी दिलं. 

भाजपचे माजी आंबोली मंडळ अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी श्री. सावंत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी देवसू बूथ अध्यक्ष अशोक सावंत, दानोली बूथ अध्यक्ष प्रभाकर सावंत, देवसू ग्रा. पं सदस्य शांताराम सावंत यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.