
सावंतवाडी : वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत तसेल तर आता आमदार बदल हवा आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचे सतराशे कोटी रुपयांचे टेंडर झालं. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. मात्र १५ ऑगस्ट उजडून गेला तरी गणवेश मिळाला नाही. फाटके गणवेश विद्यार्थ्यांना दिले गेले. २ वर्ष मुलांना एकच गणवेश घालायला लागला. आता केसरकर यांना आराम करू द्या. त्यामुळे "आता बदल हवो, तर आमदार नवो" असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
ही निवडणूक विधासभेची नाही तर महाराष्ट्रच्या स्वाभिमानाची आहे. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान ५० खोक्यात गहाण पडणार असे वाट असताना लोकसभेत जनतेने उत्तर दिले. आता सुद्धा मतदारांनो कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी आहे. हे दमदार आमदार नाहीत तर गद्दार आमदार आहेत. आणि गद्दारीला माफी नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आणि हा इतिहास तुम्ही या मतदार संघात घडवाल अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.