सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमोल राजाराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या सावंतवाडी येथील त्यांच्या जागी तातडीने मुंबई अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अमोल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यात. बुधवारी सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. अमोल चव्हाण यांनी मालवण, देवगड, विजयदुर्ग तसेच कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सेवा बजावली त्यानंतर त्यांची बदली मुंबई अंधेरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तिथे त्यांनी तीन वर्ष काम केल्यानंतर त्यांची पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.