अमित सामंतांनी बजावला मतदानाचा हक्क..!

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 10:40 AM
views 88  views

सिंधुदुर्ग : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ हायस्कूल येथे मतादानाचा हक्क बजावला.  प्रचंड उकाडा असताना देखील मतदार आपलं कर्तव्य बजावत आहेत. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदान केंद्रावर पोहचत आपला हक्क बजावावा असं आवाहन अमित सामंत यांनी केल. तर इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यासाठी पोषक वातावरण असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला.