
देवगड : देवगड तालुक्यातील कोटकामते येथे इनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते येथे रुग्णवाहिका हस्तांतरण सोहळा नीता आणि कृष्णाबाई शंकर (मास्तर) तानवडे यांच्या तर्फे श्री आनंद शंकर तानवडे यांचे द्वारा श्री नाना तानवडे यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक २६ मे २०२४ (संकष्टी चतुर्थी) या दिवशी वेळ - संध्याकाळी ५ वाजता स्थळ - श्री देवी भगवती मंदिराच्या प्रांगणात येथील (मांडात) आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, मानकरी व देवसेवक यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शान वाढवावी.असे आवाहन विश्वस्त मंडळ इनामदार श्री देवी भगवती संस्थान,देवस्थानसचिव सुनील कामतेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.