LIVE UPDATES

आंबोली ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं उपोषण

मानसिक - आर्थिक त्रास दिल्याचा आरोप
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 10, 2025 19:01 PM
views 213  views

सिंधुदुर्गनगरी : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अन्यायकारक बदली, आणि हेतू पुरस्कार मानसिक व आर्थिक त्रास दिला जात असल्याविरोधात तत्कालीन आंबोली ग्राम महसूल अधिकारी सुमित घाडीगावकर यांनी आज जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले आहे. तर याबाबत आपल्याला न्याय मिळावा. अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

तत्कालीन आंबोली ग्राम महसूल अधिकारी सुमित बाबू घाडीगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्यावर झालेल्या अन्याबाबतचे निवेदन सादर करून याबाबत न्याय मागण्यासाठी आज जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या शासकीय कामकाजाबाबत आंबोली ग्रामस्थांच्या कोणत्याही लेखी तक्रारी नसताना, माहे एप्रिल २०२५ पासूनचे वेतन, हेतू पुरस्कर रखडून ठेवण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वरिष्ठ कार्यालयास वारंवार अहवाल सादर करत असल्याचा रोष ठेवून जाणीवपूर्वक आपल्यावर आंबोली येथून शिरोडा येथे बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच शासनास व जनतेस अपेक्षित असलेले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतानाही हेतू पुरस्कर तहसील व प्रांत कार्यालयाकडून आपल्यावर कारवाई करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक होत असलेल्या अन्यायाविरोधात उपोषण करण्याची वेळ आली आहे. तरी याबाबत सखोल चौकशी करून कोणत्याही तक्रारी नसताना भविष्यात मनमानीपणे कारवाई होऊ नये. याबाबत महसूल प्रशासनाकडून लेखी आदेश व्हावेत व आपल्याला न्याय मिळावा. यासाठी सुमित घाडीगावकर यांनी उपोषण सुरू केले आहे.