मोदी @9 ; भाजपच्या जनसंपर्क अभियानाचा आंबोली मंडळ - कोलगाव ग्रा.पं. इथं शुभारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 12:04 PM
views 152  views

सावंतवाडी : मोदी@9 जनसंपर्क अभियान शुभारंभ आंबोली मंडळ व  कोलगाव ग्रामपंचायत येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावेळी हर घर चलो अभियान कोलगाव येथे राबविण्यात आले. पंतप्रधान मोदींनी केलेल्या 9 वर्षातील कार्याचा घराघरात प्रचार व्हावा या उद्देशातून हे अभियान राबविले.

यावेळी महेश सारंग, रवींद्र मडगावकर, पंढरी राऊळ, प्रथमेश तेली, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग,माडखोल सरपंच सौ.सुषमा राऊळ, आंबेगाव सरपंच शिवाजी परब,उपसरपंच श्री.गावडे, सांगेली सरपंच श्री. लवू भिंगारे, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, गुलाबराव गावडे, चौकुळ सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे, आंबोली भाजपा युवा अध्यक्ष संजय शिरसाट, मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव, शक्ती केंद्र प्रमुख संदीप हळदणकर, आनंद तळवणेकर, योगेश गवळी, खरेदी विक्री चेअरमन प्रमोद गावडे, सर्व बूथ अध्यक्ष आणि इतर सर्व भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.