आंबोली घाटात कोसळला भला मोठा दगड

Edited by: विनायक गावस
Published on: June 06, 2024 04:52 AM
views 2329  views

सावंतवाडी : आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भितीकडे जावून स्थिरावला. ही घटना आज पहाटे पूर्वीचा वस परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही.

याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे अशी माहिती पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.वर्षा पर्यटनाच्या प्रारंभी हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी अशी मागणी होत आहे.