आंबोली - गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न सुटला

Edited by: विनायाक गावस
Published on: July 04, 2023 14:03 PM
views 293  views

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित  आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. मंत्रालय येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच हा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आता आंबोली- गेळेतील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. अशी माहिती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी दिली.