सांगुळवाडी दत्त मठात उद्या अंबरनाथ राणे महाराज यांची पुण्यतिथी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 31, 2023 18:37 PM
views 158  views

वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट यांच्यावतीने श्री अंबरनाथ राणे महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे उद्या (ता.१जानेवारी )आयोजन करण्यात आलेले आहे.या दिनानिमित्त मठात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  

या दिवशी सकाळी मठात  पूजापाठ ,पालखी सोहळा, महाआरती दुपारी महाप्रसाद ,पालखी मिरवणूक, आदी कार्यक्रम  होणार आहेत. तसेच रात्री बुवा कु. दीपा कुळये विरुद्ध साची मुळंम यांचा २०-२० डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. तरी या  कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.