आंबेलीत झाड रस्त्यावर | २ तास वाहतुक विस्कळीत

Edited by: लवू परब
Published on: June 15, 2024 15:13 PM
views 48  views

दोडामार्ग : दोडामार्ग - विजघर राज्यमार्गावरील आंबेली येथे आकेशीच मोठ झाड रस्त्यावर पडल्याने येथील २ तास वाहतुक विस्कळीत झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळची वेळ असल्याने कामावर जाणाऱ्यांचीदेखील तारांबळ  उडाली होती.एसटी बस अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. अखेर हे झाड बाजूला केल्याने वाहतुक पूर्ववत सुरू झाली.

मार्गालगत असणारे धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे दोडामार्ग ते विजघर या राज्य मार्गालगत अनेक जीर्ण झाडे आहेत. शिवाय काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत. अलीकडील काही दिवसात या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना शनिवारी सकाळच्या सुमारास आंबेली येथे घडली. राज्यमार्गालगत असलेले आकेशीचा एक मोठे झाड राज्य मार्गावर पडले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. या वृक्षाने संपूर्ण रस्ताच व्यापल्याने दुचाकी नेणे अशक्य झाले. त्यामुळे गोव्याला कामाला जाणाऱ्या युवकांची चांगलीच धांदल झाली.

राज्य मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. एसटी बसही अडकून पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. अखेर ते झाड बाजूला करत वाहतूक सुरू झाली. या राज्य मार्गावर अनेक ठिकाणी सुकलेली, मार्गाच्या बाजूने वाकलेली अशी अनेक झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ही धोकादायक झाडे वेळीच हटविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.