तुमची लेक म्हणून सदैव तुमच्या पाठीशी : अर्चना घारे - परब

Edited by: दिपेश परब
Published on: May 30, 2024 11:31 AM
views 236  views

वेंगुर्ला : तुमची लेक म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभी असेन. इथला समाज, शेतकरी हा कष्टकरी आहे‌. तुमच्या  सुखदुःखात सदैव सोबत असेल अस प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी केले. तर दशावतार कला ही कोकणचा जीव आहे असं त्या म्हणाल्या. आसोली येथील माईनतडवाडी मित्रमंडळाच्यावतीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना अर्चना घारे बोलत होत्या‌.

दशावतारी कला म्हणजे कोकणचा जीव, कोकणातल्या मातीत रुजलेली आणि बहरलेली लोककला म्हणचे दशावतार आहे. आसोली सक्राळवाडी येथे माईनतडवाडी मित्रमंडळाच्यावतीने "अमृतनाथ दशावतार" या नाट्य प्रयोगाच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी उपस्थित राहून  दशावतार नाट्य पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी आयोजकांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अर्चना घारे यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. या आधुनिक युगामध्ये आपल्या सर्व रूढी, परंपरा जपण्याचे काम हे कलाकार करत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. आसोली सक्राळवाडी हे सूरंगीचे गाव म्हणून परिचीत आहे.

सुरंगीची फुले येथे बहरतात‌‌. इथला समाज, शेतकरी हा कष्टकरी आहे‌. त्यामुळे यापुढे तुमच्या सुख दुःखात सदैव तुमच्या पाठीशी तुमची लेक म्हणून उभी राहणार असा शब्द दिला. सुरंगीसाठी बाजारपेठ, शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्राधान्य राहील अस मत  अर्चना घारे परब यांनी व्यक्त केले. नाट्यप्रयोगा दरम्यान सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अमृतनाथ पारंपरिक नाट्य मंडळ, म्हापणचे मालक अनिल गोसावी, ग्रामस्थ मिलिंद नाईक, तात्या धुरी, बाळू धुरी, विजय धुरी, रिया धुरी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष विक्रांत कांबळी आदी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर आवर्जून सर्व दशावतार कलाकार यांची त्यांनी भेट घेत विचारपूस केली.