सायबर गुन्हे टाळण्यासाठी नेहमी सर्तक रहा : उपनिरीक्षक अमित गोते

Edited by: विनायक गावस
Published on: October 29, 2023 16:43 PM
views 92  views

सावंतवाडी : सायबर क्राइम हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे सायबर क्राइम हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये संगणक आणि नेटवर्कचा समावेश असतो जसे की ईमेल स्पॅम फिशींग पायरेसी डेटा चोरी हॅकिंग अशा पद्धतीने हे गुन्हे घडतात याद्वारे अनेकांनी आर्थिक फसवणूक देखील केली जाते. विशेषत विद्यार्थी महिला व व्यापारी याला बळी पडतात. त्यामुळे या प्रकारांपासून सावध रहा असे आवाहन सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी केले.

सिंधुदुर्ग पोलिस दल पोलिस जनता संवाद सायबर सुरक्षा उपक्रमांतर्गत मळगाव इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्याशी संवाद साधून सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सायबर सुरक्षा अंतर्गत सोशल मीडिया पासवर्ड तसेच विविध विषयावर माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना व्यायाम अभ्यास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वताची जबाबदारी स्वच्छता कर्तव्य देशाभिमान एकात्मता ध्येयाचे महत्व पटवून दिले. 

 यावेळी महेंद्रा ॲकडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर,पोलिस हवालदार श्री.सावळ,महिला समुपदेशक श्रीमती नमिता परब, मळगाव इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक फाले व अन्य शिक्षक उपस्थित होते. सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे व पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी विद्यार्थ्याना सेक्युरिटी डेटा प्रायव्हसी डेटा, शेअरिंग, आयडेंटिटी, हॅकिंग, अकाउंट क्लोनिंग, यासंदर्भात सुरक्षा व वाढते धोके यावर उपाययोजनांबाबत विस्तृत माहिती दिली. आर्टिफिशियल इंटेलिजंटबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.