शिक्षण महर्षी अल्ताफ खान यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: July 20, 2024 17:09 PM
views 246  views

सावंतवाडी: शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक अल्ताफ खान यांचे निधन झाले. कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यासाठी त्यांनी आपल्या घरात स्वतःची अशी मोठी लायब्ररी तयार केली होती. सावंतवाडीच्या शांतता कमिटीवर सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाल न्याय मंडळाचे सदस्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्डाचे सदस्य, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे लोकपाल म्हणून देखील काही काळ ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी शोक व्यक्त करीत त्यांच्याप्रती श्रद्धांजली वाहिली.