
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा राज्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. राज्यातील २००५ नंतर नियुक्त कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही अत्यंत मूलभूत आणि संविधानिक मागणी आहे. यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने दिनांक १४ मार्च पासून सुरू होणाऱ्या संपामध्ये सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर संप यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी, विभागीय अध्यक्षांनी आणि राज्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे, असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, सरचिटणीस आकाश तांबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.