'या' रेल्वे स्टेशनसाठी सर्वपक्षीय बैठक !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 26, 2023 15:47 PM
views 122  views

कुडाळ : कसाल रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे या मागणीसाठी कसाल ग्रामपंचायत हॉल येथे महत्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शुक्रवार 29 डिसेंबर होणार आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन कसाल ग्रामपंचायत सरपंच राजन परब यांनी केल आहे. 


कसाल रेल्वेस्टेशन मंजूर होण्याकरीता गेली २५ वर्ष कसाल दशक्रोशी सरपंच व नागरिक झगडत आहे. कसाल दशक्रोशितील व जवळपासच्या सर्व गावातील नागरीकांचा प्रवास सुखकर व्हावा, येथील मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा. याकरीता कसाल रेल्वेस्थानक मंजूर होणे महत्वाचे आहे. याकरीता महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकी करीता अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघटनेचे मुंबईचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. दशक्रोशीतील सर्व गावातील सरपंचांनी शुक्रवार २९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वा.कसाल ग्रामपंचायत सभागृह येथे उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन कसाल गावचे सरपंच राजन परब यांनी केले आहे.