आचारसंहिता संपल्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढणार

युपीतील गुंडांना पोलिस संरक्षण का दिलं ? : संजू परब
Edited by: विनायक गांवस
Published on: December 04, 2025 13:30 PM
views 673  views

सावंतवाडी : युपीतील माणस सावंतवाडीत आणून कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार केला, उद्या ते मर्डरही करतील. हे प्रकार दुर्दैवी असून आचारसंहिता संपल्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला. तसेच युपीतील गुंडांना पोलिस संरक्षण का दिलं होत‌ ? हे पोलिसांनी जाहीर करावं असही आव्हान दिलं. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते. 


ते म्हणाले, मतदानाचा टक्का वाढल्यानं त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.  युपीतील माणस सावंतवाडीत आणून कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ती गाडी अडवली म्हणून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. आम्ही सोडवायला गेलो तर आमच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर त्या गाडीत असलेल्या युपीतील गुंडांना पोलिस संरक्षण होत‌. त्यामुळे तो पोलिस कुणासाठी होता ? त्या गाडीत का होता ? तो कुणाच्या संरक्षणासाठी होता ? हा प्रश्न आहे. पोलिसांनी याचा खुलासा करावा. तर ती गाडी विशाल परब यांची असून त्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. युपीतील माणसांचं इथे काम काय ? या सगळ्या विषयांवर जिल्ह्यात आळा बसावा म्हणून सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत. त्यांनी एखादा मर्डर केला तर जबाबदार कोण ? युपीतील माणस शहरात असतील तर त्यांची नावं सार्वजनिक करावी. जर ब्रेक लागला नसता तर दोन- तीन लोकांचा बळी गेला असता. त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर युपीतील माणसांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे.