मविआतील सर्वांना विचारात घेत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा : अमित सामंत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 04, 2023 12:22 PM
views 287  views

देवगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे ठामपणे उभे असून देवगड तालुक्यातील शंभर टक्के पदाधिकारी व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते व शरद पवार यांचे विश्वासू सहकारी नंदूशेठ घाटे यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर देवगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एक संघपणे नंदकुमार घाटे यांच्या समवेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समवेत आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील,तसेच देवगड तालुक्यातील तिकीट वाटप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी देण्याचा सर्वाधिकार देवगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे यांना असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विश्वासात घेऊनच आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक संघपणे उमेदवार व जागा वाटपाचा निर्णय घ्यावा व तसा निर्णयही निश्चितपणे घेण्यात येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी देवगड तालुका दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व शरद पवार यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत.

त्या अनुषंगाने तालुका निहाय दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व एक संघपणा निर्माण करत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याकरता ठिकठिकाणी दौऱ्याच्या निमित्ताने भेटी देत आहोत.असे सांगून तालुक्यातून उस्फुर्तपणे कार्यकर्त्यांच्या प्रतिसाद लाभत आहे.असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत  जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक प्रमुख नजीर शेख, जिल्हा कोषाध्यक्ष अभय बापट, युवक जिल्हाध्यक्ष ऍड विशाल जाधव जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब,जिल्हा कार्यकारी सदस्य निलेश पेडणेकर, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव ,चंद्रकांत पाळेकर, तालुका सरचिटणीस शरद शिंदे शहराध्यक्ष बंटी कदम महिला अध्यक्ष नयना आचरेकर, रसिका पेडणेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे बोलताना सामंत म्हणाले मागील दोन महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या तिन्ही नेत्यांनी दौरे करून या तिन्ही नेत्यांच्या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद लाभला व या दौऱ्यामधून या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे शरद पवारांसोबत असल्याचे दाखवून दिले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याच अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी दौरा करीत असून देवगड तालुक्यात देखील अशाच पद्धतीने दौरा करण्यात आला आहे व त्या दौऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. व त्यांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे .