आठवडा बाजारात फिरत्या व्यापाऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप

राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी घेणार आक्रमक पवित्रा
Edited by: विनायक गांवस
Published on: February 21, 2023 14:45 PM
views 219  views

सावंतवाडी : सावंतवाडी आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लूट केली जात आहे. पन्नास रुपयांची पावती देऊन दोनशे रुपये व्यापारी वर्गाकडून घेतले जात आहे. व्यापारी वर्गाला कमी रूपयांची पावती देत जास्त दर आकारणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक पवित्रा घेणार आहे. त्यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली आहे. यावेळी पुंडलिक दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष व्यापाऱ्यांची जाऊन भेट घेऊन माहिती घेतली. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, हिदायतुल्ला खान ,याकूब शेख ,आधी पदाधिकारी उपस्थित होते.