
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सावंतवाडीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रीत येत छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. उभा बाजार येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिपाली भालेकर,अँड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.