महायुतीचे सर्व नेते एकत्र : रवींद्र चव्हाण

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 07:27 AM
views 202  views

सावंतवाडी : ५१ वं राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यांसह माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, सावंतवाडी शहराचा विकास झपाट्याने होत आहे‌. महायुतीच्या सरकारमुळे विकासाला गती येत आहे. हे सरकार सामान्यांच सरकार आहे.  माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाठपुरावा केलेल्या नळपाणी योजनेचा आज शुभारंभ होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मेहनत घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना होऊ शकली. आज नळपाणी योजनेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नेते एकत्र आहोत. विकासासाठी आमचा नेहमी पुढाकार आहे असं रविंद्र चव्हाण म्हणाले.