
सावर्डे : फलाहे दारेन सोसायटी चिपळूण संचलित अली पब्लिक स्कूल सावर्डे येथे बुधवार 29 जानेवारीला ओरोगामी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी सावर्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर हे उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका मदिया तांबे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या प्रस्ताविकेतून त्यांनी उद्धव तोडकर यांनी आपल्या 37 वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत कलेसाठी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी लोकल कमिटीचे सदस्य साजिद चिकटे यांनी श्री तोडकर यांचे स्वागत केले.
प्रथम तोडकर यांनी ओरोगामी म्हणजे काय त्याचा जीवनात होणारा उपयोग कला ही जीवनाची कशी सावली आहे याची सविस्तर माहिती आपल्या ओघवत्या शैलीत दिली.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. त्यातून विविध वस्तू टाकाऊ पासून टिकाऊ कशा बनवायच्या या उद्धव तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकल्या. या कार्यशाळेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वसीमा चिकटे, सफिना चौगुले, झेबा आचरेकर, मुसिफ जांभरकर, अस्मिना बोंबल इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.