रत्नागिरीत अलर्ट ! अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या करोना रुग्णाचा मृत्यू

आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आल्यावर व्हेरीयंट कळणार
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 28, 2022 09:21 AM
views 373  views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या करोना रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला दमा व अस्थमाचा आधीपासून त्रास होता व काल रात्रीपासून या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, या रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल उद्या रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकांनी घाबरू नये तसेच जिल्ह्यात करोनाचा नवीन व्हेरिएंट दाखल झाला आहे का? हे आरटीपीसीआर अहवालानंतर स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.