अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची बैठक

Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2024 08:47 AM
views 79  views

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण व्हावे, यासाठी पावसाळी अधिवेशनापुर्वी मागणी करणारे निवेदन दिले जावे तसेच विधिमंडळाने याबाबत ठराव मंजूर करून भारतीय रेल्वे बोर्डाकडे पाठवावा अशी मागणी करण्यात येणार आहे. यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक दादर येथे अध्यक्ष शांताराम शंकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, दुपदरीकरण, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम त्वरीत पूर्ण करणे, त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देणे,वैभवाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करणे आवश्यक आहे.कोकण रेल्वेच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. कोकणातून निवडून आलेल्या खासदारांच्या भेटीगाठी घेऊन वरील कामे त्वरीत पूर्ण करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यासंबंधी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

रेल्वेमंत्र्यांची कोकणच्या खासदरांसह व पियुष गोयल यांना बरोबर घेऊन भेट घेणे. निश्चित करण्यात आले. तसेच कोकणातील सर्व आमदारांच्या व मुंबईतूनही निवडून आलेल्या कोकणी आमदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कोकण रेल्वे च्या प्रश्नांवर येत्या विधानसभा अधिवेशनात एकत्रितपणे आवाज उठविण्यासाठी भागपाडणे आवश्यक आहे, अशी चर्चा झाली.

यावेळी यशवंत जड्यार यांच्याऐवजी अक्षय महापदी यांची सचिव पदावर तर ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी तर अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. तसेच खजिनदार मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला.

या सभेला ॲड. योगिता सावंत, श्रीकांत सावंत, शांताराम नाईक, सुनिल उतेकर, दीपक चव्हाण, विशाल तळावडेकर,अक्षय महापदी,राजू कांबळे, तानाजी परब,रमेश सावंत,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र नेमळेकर,अभिषेक शिंदे,प्रमोद सावंत, आशिष  सावंत, मनोज  सावंत,सुधीर वेंगुर्लेकर,सागर तळवडेकर ,संजय सावंत, अभिजित धुरत आदी उपस्थित होते.