धाटावनगरीत अखंड हरिनाम सप्ताहाला शुभारंभ!

राज्यातील प्रख्यात कीर्तनकारांची लाभणार उपस्थिती
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 17, 2022 16:17 PM
views 245  views

शशिकांत मोरे


रोहा  : रोह्यात धाटावनगरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंचक्रोशीतील वारकरी सांप्रदायाचा ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे संबंध रोहेकरांसाठी जणू एक पर्वणीच ठरत आहे.  शनिवार दि. १७  ते २० डिसेंबर   या ४ दिवसांमध्ये होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाला शनिवारी पहाटे काकड आरती बरोबर पुंडलिक वरदे,  हरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने शुभारंभ झाला. याप्रसंगी वारकरी संप्रदाय प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

या सप्ताहामुळे किल्ला धाटाव पंचक्रोशीतील संबंध वारकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. सकाळी ८ ते १२ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी वांदोली येथील हभप दिनेश कडव महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. धाटावनगरीत वारकरी सांप्रदायाच्या या अखंड हरिनाम सप्तहाला संपूर्ण रोह्यातील वारकरी मंडळींचा जणू वैष्णवांचा मेळा भरला असून महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात कीर्तनकारांची उपस्थिती याठिकाणी लाभणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून धाटावनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम हभप पुरुषोत्तम पाटील महाराज (बापू), यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून वारकरी सांप्रदायाची मंडळी पारायणाचे, काकड आरतीचे नेतृत्व करीत आहेत. या कार्यक्रमाला मृदूगंमणी, गायनाचार्य यांची मोलाची साथ लाभणार आहे.

दरम्यान कार्यक्रमासाठी आ. अनिकेत तटकरे यांनी सुद्धा हजेरी लावून दर्शन घेतले. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय मंडळीबरोबर महाप्रसादाच्या पंगतीत बसून प्रसादाचा आनंद घेतला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, रोहिदास पाशिलकर, सुसगावचे माजी उपसरपंच नारायण चांदे, श्रीराम पतपेढी अध्यक्ष बजरंग चांदेरे, डॉ. राजू जाधव, यशवंत रटाटे यांसह ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते. याठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

पंचक्रोशी कमिटीमधील पांडुरंग दळवी, दत्ताराम खेरटकर, तुकाराम बांदल, मधुकर बामुगडे, शिवाजी रटाटे, नामदेव ओमले यांसह गावातील किशोर रटाटे, नयन रटाटे, रमेश भोकटे, गणेश म्हसकर, मुकेश भोकटे, संतोष रटाटे, राकेश म्हसकर, दिलीप धोंडगे, रवींद्र रटाटे यांसह तालुक्यातील सर्व वारकरी मंडळ, महिला, तरुणवर्ग कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक मेहनत घेत आहेत.