
वैभववाडी : श्री धाकुबाईदेवी प्रा.वारकरी सांप्रादाय भजन मंडळ, मुंबई आणि आखवणे वरचीवाडी मंडळ यांच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किंजळीचा माळ येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दररोज पहाटे ५ ते ६ वा.काकड आरती, सकाळी १० ते १२ वा. वारकरी नित्य नेमाचे भजन, सायंकाळी ५.३० वा. ते ६.३० वा. प्रवचन, सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ , राञौ ९ ते ११ वा किर्तन तर राञौ ११ वा. नंतर जागर होईल.
यावेळी ह.भ.प.ज्योतीताई धनाडे ( जालना) भास्कर महाराज बागवे ( मुंबई) कृष्णा महाराज राऊत ( बीड) अनंत महाराज मोरे ( मौंदे ) यांची प्रबोधनात्मक किर्तने होणार आहेत. तर ह.भ.प. सदानंद महाराज मोरे, रमेश महाराज मोरे, भास्कर महाराज बागवे हे प्रवचन करणार आहेत.
दिनांक २ फेब्रुवारी रोजी, काल्याचे किर्तन, महाप्रसाद व दिंडी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे. तर ३ फेब्रुवारी रोजी हळदीकुंकू समारंभ व सत्यनारायण महापुजा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन मंडळाच्यावतीने अध्यक्ष मानाजी घाग, सचिव शैलेंद्र पडवळ,यांनी केले आहे.