
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाची चिन्हे असताना. अजित पवार यांच्या दौऱ्यावर पावसाच्या सावटामुळे प्रश्नचिन्ह होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. आणि बरोबर त्याच वेळेला ठरलेल्या वेळेवर आकाशात हेलिकॉप्टर ची घरघर कानावर पडली. सावर्डेेतील सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या मैदानावर अजित पवार यांचे हेलिकॉप्टर उतरले आहे.
अजित पवार यांचे संस्थेतील मैदानावर विद्यार्थीनींनकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सावर्डे बाजारपेठेत ग्रामस्थांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.