सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षपदी अजित नातू

Edited by: विनायक गावस
Published on: June 21, 2023 17:53 PM
views 100  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षपदी अजित रामचंद्र नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी ही नियुक्ती केली असुन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत नातु यांना नियुक्ती पत्र देण्यात आल.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संसदरत्न खा. सौ. सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून  सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्ष बांधणी करत पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार असा विश्वास अजित नातू यांनी व्यक्त केला. 


याप्रसंगी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, भास्कर परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.