
देवगड : देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडीमध्ये माजी आमदार अँड. अजित पांडुरंग गोगटे याची चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी माजी उपसभापती रवींद्र राजाराम तिर्लोटकर यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया अनिल राहींज यांच्या अध्यक्षतेखाली ही करण्यात आली.
नवीन संचालक मंडळ खालील प्रमाणे : अजित पांडुरंग गोगटे चेअरमन, रवींद्र राजाराम तिर्लोटकर व्हाईस चेअरमन, तर संचालक रामदास अनंत अनुभवणे, माधव जनार्दन कुलकर्णी, संतोष कुमार झिलू फाटक, प्रवीण मुकुंद राणे ,राजेंद्र शामराव शेट्ये, सुभाष सखाराम नार्वेकर, चंद्रकांत शंकर पाळेकर,संपदा शैलेश बोंडाळे, रेश्मा विद्याधर जोशी, संतोष मनोहर किंजवडेकर, शैलेंद्र नाना जाधव.