
सावंतवाडी : आजगाव भोमवाडीचे सुपुत्र रिचर्ड कामील फर्नांडिस यांचा अनेक वर्षाच्या विविध अटी व शर्तींचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी आजगाव येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये सिंधुदुर्ग धर्म प्रांताचे माजी धर्मगुरू बिशप अल्विन बराटो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुमारे 50 धर्मगुरूंच्या उपस्थितीत फादर म्हणून दीक्षांत समारंभ पार पडला.
प्रारंभी आजगाव धर्म प्रांताचे फादर इलीएस रोड्रिक्स यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून नवोदित फादर रिचर्ड यांच्या दीक्षांत समारंभाची माहिती दिली. फादर मार्क्स रेंजर यांनी यावेळी उपस्थितताना शपथविधीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर धर्मगुरू बिशप यांनी पवित्र मिसाची सुरुवात केली. फादर रिचल्ट सालढाणा यांनी नवोदित फादर रिचर्ड फर्नांडिस यांना वस्त्र परिधान करून शपथ दिली.
यावेळी फादर अंद्रू डिमेलो ,फादर एलीयास रॉड्रिग्ज ,फादर रिचर्ड सलडाणा , फादर सायमन डिसोजा, फादर मिनिट डिसोजा, फादर कॉन्स्टंट अँथोनी, फादर फेलिक्स लोबो, फादर फ्रान्सिस डिसोजा ,फादर फ्रान्सिस वेट टू पार्क किल, फादर आनंद मासेज रेंजस फादर रोझर मिल्टन यांच्यासह मुंबई गोवा पुणे येथील सुमारे 50 धर्मगुरू व सिस्टर व शेकडो समाज बांधव यांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडला.