आजगाव विद्या विहार हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गुणगौरव

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 11:51 AM
views 137  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलमध्ये यंदाच्या दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल 96.15% लागला असून प्रथम क्रमांक काजल सुनील मुळीक 91.60%, द्वितीय क्रमांक वैष्णवी ईश्वर थडके 87.60%, तृतीय क्रमांक विराज अनंत प्रभू साळगावकर 87% यांनी मिळवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी आजगाव ग्रामपंचायतमार्फत शाळेतील सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, माजी पंचायत समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या मनिषा गोवेकर, ग्रामसेवक श्री. गवस, ग्रामपंचायत सदस्य राकेश सावंत, वर्षा रेवाडकर शलाका वाडकर, वैष्णवी आजगावकर तसेच अध्यापक विद्यालयाचे प्रा. गणेश तुंगार, प्रा. भरमण्णा वाणी,  ग्रामस्थ चंदू पांढरे, दीपक गावडे, तसेच अन्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मानसी परुळेकर यांनी केले तर शकाव्या साळवी यांनी आभार मानले.