
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा शासकिय निमशासकिय सह.बॅक कर्मचारी सहकारी पतपेढीवर अजय नाईक यांची संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
१५ जुलै २०२३ रोजी पतसंस्थेची मासिक सभा पार पडली. यावेळी सभेत अजय नाईक यांची एकमताने बीनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली. सन २०२४-२५ या पर्यंत कालावधीसाठी ही निवड करण्यात आली. निवड होताच संस्थेचे अध्यक्ष शरद नारकर, उपाध्यक्ष कुंटे यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.