सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी अजय गोंदावळे

Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2024 16:22 PM
views 69  views

सावंतवाडी : भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही. डी. गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या समवेत सहसचिव ए. ए. गावडे, आर. के. जाधव, सल्लागार सी. एन. देशपांडे, राजू ठाकूर, कार्याध्यक्ष बायली तुळसकर, खजिनदार अरुण सरदेसाई, सहखजिनदार सुजल मसुरकर, प्रसिद्धी सचिव मोसीन शेख, संघटक सचिव सुवर्णा जोशी, निलम खरात, विभागीय सदस्य आर. एस. गावकर, आनंद पी. राणे, पी. एस. शेट्ये, जी. पालयेकर, बी. एस. लातये, सदस्य एस. एस. परम, ए. व्ही. भिरंडेकर, सारिका महाडगुत, प्रथमेश हेळेकर, आर. यु. सावंत आदींची निवड करण्यात आली.